Akola Headmasters, collect receipts for students' ties, belts and shoes! Otherwise  
विदर्भ

मुख्याध्यापकांनो विद्यार्थ्यांच्या टाय, बेल्ट आणि बुटांच्या पावत्या जमा करा! अन्यथा...

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या टाय, बेल्ट, बूट, माेजे यांच्या मूळ पावत्या जमा करण्यासाठी आता ३० मेपर्यंतची मुदत मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. यापूर्वी पावत्या जमा दाेन दिवसात जमा करण्याचा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी १८ मे राेजी दिला हाेता. पावत्या जमा न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला हाेता. आता पावत्या जमा करण्याची मुदत वाढविल्याने मुख्याध्यापकांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषदेचा शैक्षणिक दर्जा खासगी शाळा, कॉन्व्हेटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. परिणामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये बहुता:श शासकीय कर्मचारी आपल्या पाल्यांना शिकवत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या प्रयत्नांतील एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना टाय, बेल्ट, बूट माेजे वितरीत करण्यात आले.

यासाठी लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमही जमा करण्यात आली. मात्र टाय , बेल्ट, बूट, माेजे यांच्या मूळ पावत्या जमा झाल्या नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी या शिक्षणाधिकाऱ्यांनी (प्राथमिक) साहित्य खरेदीच्या पावत्या सादर करण्याचा आदेश जारी केला हाेता. मात्र दाेन दिवसात पावत्या सादर न झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर कार्यवाही करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही गट शिक्षणाधिकाऱ्यांची राहिल, असेही आदेशात नमूद करण्यात आले. मात्र टाळेबंदी-संचारबंदीमुळे पावत्या जमा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही मुदत आता ३० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT